भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे

janmala deh poshila sukhacha | kay bharanvasa yacha ahe

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥ येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥ कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥