भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा

janma yeuni taya labh jala | bidavai bhetala panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥ धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला ॥२॥ प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषन होय त्याला ॥३॥ पावटणि पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥ प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥५॥ तें दुर्लभ संसारासी । जडजीव उद्धारलोकासी ॥६॥ तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥७॥