भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें

janma yeuni kay kelen | tuvan mudal gamavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥१॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥ तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ॥३॥