भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया

janma yenen ghade patakache mulen | sanchitachen phal apuliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥ ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥ तुका म्हणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥