भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा

jane bhakticha jivhala | tochi daivacha putala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥ नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥ तुका म्हणे नवविध । भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥