भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार

janaven ten sar | nahin tari daga phar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥ डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥ बहु थोडया आड । निवारितां लाभें जाड ॥२॥ तुका म्हणे खरें । नेलें हातींचे अंधारें॥३॥