भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं

janaten lekarun | mata lage dur dharun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥ तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥ नाहीं मुक्तफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥ तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि॥३॥