भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीं च

janapan baren devache te shirin | amhi aisin barin nenatin cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥ देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥ आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरी खेळा समबुद्धी ॥२॥ तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव झाला ॥३॥