भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें

jan vijan jalen amhan | viththalanama pramanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥