भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा

jan puji yacha maj kan abhar | ha tuhmi vichar janan deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥ पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळें ॥ध्रु.॥ मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥ आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आम्हां दीनां पीडा करूं ॥३॥ आपुलिया हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा तोचि आम्हां ॥४॥