भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळों अगी पडो खान । नारायण भोगिता

jalon agi pado khan | narayan bhogita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळों अगी पडो खान । नारायण भोगिता ॥१॥ ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥ भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा गोविंदा पावलें ॥२॥ तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥