भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला

jala tumhi majhen janaten mipan | yenen majha khun mandiyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥ खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥ तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥ तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥३॥