भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी

jaisin taisin tari | sharanagaten tujhin hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥१॥ आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥ शुद्ध नाहीं चित्त । परी म्हणवितों भक्त ॥२॥ मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझे तुका ॥३॥