भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली

jaisi taisi tari vani | mana ani mauli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥ लेकरांच्या स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ॥ध्रु.॥ मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करी तें ॥२॥ तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हे ॥३॥