भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें

jaisha tumhi duri ahan | taisha raha antaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥ नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥ अवघा हाचि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥ तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥