भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे

jaisen taisen rahe devachen hen denen | yatna karitan tenen kay navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥ मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥ तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥