भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे

jaisen davi taisa rahe | tari kan dev duri ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥ दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥ माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरी ॥२॥ तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥