भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता

jaisa taisa atan | maj praman ananta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥१॥ पायां पडणें न सोडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥ एका भावें चाड । आदी तेचि अंतीं गोड ॥२॥ तुका म्हणे आम्हां । टळणें चि नाहीं नेमा ॥३॥