भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें

jagin manya kelen ha tujha dekar | kin kanhin vichar ahe pudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥ तोंवरी हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥ तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥