भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगासि गौसणी ब्रह्मरुपें देखिली

jagasi gausani brahmarupen dekhili

जगासि गौसणी ब्रह्मरुपें देखिली । ते मी अंतरीं पांगुरली अंतरामाजि ॥१॥ अंतरींचे सुख अंतरीं निमालें । अंतर बैसविलें ब्रह्मपदीं ॥२॥ बापरखुमादेविवर ब्रह्मपदीं देखिला । मजमाजी सामावला अद्वैतपणें ॥३॥