भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा

jadalon ton atan payin | houn kain vegala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा ॥१॥ तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥ सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥ वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥