भजनी मालिका
← भजनांकडे परत

इवलेंसें रोप लाविलें द्वारीं

ivalensen rop lavilen dvarin

इवलेंसें रोप लाविलें द्वारीं । त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥ मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला ॥ फ़ुलें वेंचिता अतिभारुकळियांसि आला ॥२॥ मनाचिये गुंती गुंफ़ियेला शेला ॥ बापरखुमादेविवर विठ्ठलीं अर्पिला ॥३॥