भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा

itulen karin deva aiken hen vachan | samul abhiman jalin majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संत चरणरज वंदीं माथां ॥२॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथा दिवसरात्रीं ॥३॥ भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥