भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार

itukenchi dei ramanan mukhin | santanchi sangati seva sar

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥ निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥ उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥ चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥