भजनी मालिका
← भजनांकडे परत

इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी

inamachi bharali peth | bhu vaikunth pandhari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी ॥१॥ चंद्रभागा वाळवंट । संत घनदाट नाचती ॥२॥ टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥ चोखा जातो लोटांगणी । घेत पायवणी संतांची ॥४॥