भजनी मालिका
← भजनांकडे परत

इहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं

ihalokin amhan vastichen penen | udasin tenen dehabhavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥१॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥ सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥ तुका म्हणे वेंचे लाविला संचिता । होईल घेतां लोभ कोणां ॥३॥