भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपिस्थती चाड

ichchhiti tayansi vhaven ji arup | amhansi svarupisthati chad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥ लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी धरावया ॥२॥ लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥ घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रम्हज्ञानी ॥४॥ तुका म्हणे माझा कोठें भक्तीरस । पाडावया ओस चाळविसी ॥५॥