भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे

ichchhepashin alon phironi maguta | svamisevakata avadiche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥ उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥ तुका म्हणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥