भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें

ichchhechen pahilen | dolin antin mokalilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥ यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥ पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥ अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधीं हरी ॥५॥