भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण

ichchhaven ten javali alen | kay bolen karan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥ तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥