भजनी मालिका
← भजनांकडे परत

हींच त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें

hinch tyanchin panchabhuten | jivan bhaten premachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हींच त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥ हा च काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥ तुका म्हणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥३॥