भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा

hin yati majhi deva | kaisi ghade tujhi seva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥ माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥ माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥