भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीन शुर बुद्धीपासीं । आकृतीसी भेद नाहीं

hin shur buddhipasin | akrutisi bhed nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हीन शुर बुद्धीपासीं । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥ तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥