भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं

hatinchya kankana kasaya arasa | dharava bharavansa viththalanamin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥ नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥ योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥ चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥ हे पण पहा: संत साहित्य पुस्तके विकत घ्या