भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण

hatinchen na sandaven deven | sharan alon jiven bhaven | apulen aisen mhanaven | kariton jiven nimbalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥ मरती मेलीं नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तोचित्तीं दृढ द्यावा ॥३॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥५॥