भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें

hatin dharun javen | tenen paraten chi vhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥ देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥ तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥