भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन

harivansh puran harinam sankirtan

हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणें कांही ॥१॥ तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गे गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्व काळ ॥४॥