भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीनें माझें हरीलें चित्त । भार वित्त विसरलें

harinen majhen harilen chitta | bhar vitta visaralen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीनें माझें हरीलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥ पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥ तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं परतुनी ॥३॥