भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों

harinamachen karuni tarun | bhavasindhupar utaralon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरीनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥ हरीनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥३॥ येणें चि बळें सरते आम्ही । हरीचे नामें लोकीं तिहीं ॥४॥ तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥