भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीनाम वेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली

harinam veli pavali vistar | phalin pushpin bhar volhavali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीनाम वेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥ मुळींचिया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी झालियाची ॥२॥ तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥