भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची

harikathechi avadi deva | karito seva dasanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥ म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥ निर्लज्ज भोजें नाचे रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥ तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवासाठी ॥३॥