भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें

harijanachi konan na ghadavi ninda | sahat govinda nahin tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥ द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥ न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बिळभद्र ॥४॥ तुका म्हणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥