भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं झालों

harijana pran vikali he kaya | ankila mi taya gharin jhalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं झालों ॥१॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उच्छीष्ठाची धणी घ्यावयासी ॥२॥ चालतां ते मार्गी चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥ दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगे ॥४॥