भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीहरां भेद । नाहीं करूं नये वाद

hariharan bhed | nahin karun naye vad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥२॥ उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥