भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं

haridasachiye gharin | maj upajava janmantarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥ म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥ संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । शक्ती देई नाचें रंगीं ॥३॥