भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये

harichya dasan bhaye | aisen bolon ten hi naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरीच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥ खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥