भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे

harichi harikatha navade jaya | adham mhanatan taya vel lage

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं । उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि न धरी लंड लाज कांहीं ॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी । देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥ राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥