भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज

hari tujhi kanti re sanvali | mi re gori champekali | tujhya darshanen hoin kali | mag hen vali jan maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥ तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥ मज ते हांसतील जन । धिक्कारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥३॥ तुज तव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । कसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥