भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी

hari gopalansaven sakalan | bhete galya gala melavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥ योगियांच्या ध्याना नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥ तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास हाका मारी ॥३॥