भजनी मालिका
← भजनांकडे परत

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी

hanumant mahabali | ravanachi dadhi jali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन ॥२॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥